Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कादवा नदीच्या पुराने म्हेळुस्के ग्रामस्थांचा संपर्क तुटला

Share

म्हेळुस्के | (वार्ताहर)

गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे व करंजवन धरणातील वाढलेला जलसाठा लक्षात घेऊन कादवा नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे नदीपात्रातील जलस्तर वाढून नदीप्रवाहाला पुराचे स्वरुप प्राप्त झाले असून म्हेळुस्के-लखमापुर गावांना जोडणारा व म्हेळुस्के ग्रामस्थांसाठी दळण-वळणासाठी उपयुक्त असणारा म्हेळुस्के गावालागत असलेला पुल पूर्णतः पाण्याखाली गेल्याने म्हेळुस्के ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे.

करंजवन धरणातून तब्बल दहा हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत असल्याने कादवा नदीपात्र दुथडी भरून वाहत असून म्हेळुस्के येथील स्मशानभूमी नदीपात्राला लागून असल्याने स्मशानभुमी जलमय झाली आहे.

धरण साठ्यात वाढत्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता आणखी मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जाऊ शकतो.याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!