कबड्डीचा थरार आता रुपेरी पडद्यावर!

0

दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी लवकरच एका नव्या विषयावर चित्रपट करणार आहे.

प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डी हा खेळ अनेकांपर्यंत पोहोचला आणि खऱ्या अर्थाने कबड्डीलाही ग्लॅमरस टच मिळाला.

क्रिकेटप्रमाणेच हा खेळही अनेकांच्या फेव्हरेट लिस्टचा भाग झाला. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडू नावारूपाला आले. याच कबड्डीच्या खेळावर अश्विनी अय्यरचा नवा चित्रपट आधारित असेल.

फॉक्स स्टार स्टुडिओजने या चित्रपटाच्या निर्मितीचा भार घेतला असून अश्विनी सध्या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करत असल्याचे वृत्त ‘स्पोर्ट्सकीडा’ने प्रसिद्ध केले.

LEAVE A REPLY

*