#KaayReRascala : TWEET: ‘काय रे रास्कला!!’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

0

तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेता पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित ‘व्हेंटिलेटर’  नंतर  प्रियंकाने ‘काय रे रास्कला’ म्हणत तिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतच लाँच केलंय.

‘व्हेंटिलेटर’ ची सर्वत्र हवा असतानाच प्रियंकाच्या दुसऱ्या मराठी सिनेमाची चर्चा सिनेसृष्टीत जोरात  सुरु होतीच आणि इतके दिवस आतुरतेने वाट  पाहायला लावणारा हा  चित्रपट टकाय रे रास्कलाट हसवत हसवत फसवायला आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

गिरिधरन  स्वामी दिग्दर्शित या सिनेमात गौरव घाटणेकर आणि भाग्यश्री मोटे ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला  मिळणार आहे.

डॉ. मधू चोप्रा आणि प्रियंका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स  निर्मित “काय रे रास्कला”  हा सिनेमा येत्या १४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्राला निखळ हसविण्यासाठी सज्ज आहे .

 

LEAVE A REPLY

*