Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

रॅगिंगने पुन्हा डोके वर काढले; मेडिकलच्या प्रथम वर्षातील १५० विद्यार्थ्यांनी केले ‘टक्कल’

Share

सैफई | वृत्तसंस्था 

उत्तर प्रदेशमधील एका नामांकित विद्यापीठात वैद्यकीय विभागाच्या पहिल्या वर्षातल्या १५० मुलांनी टक्कल करून कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, सिनियर विद्यार्थ्यांना या ज्युनियर असलेल्या विद्यार्थ्यांनी सल्युटदेखील केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  रॅगिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या घटनेची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून विद्यापीठ प्रशासनाला याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. उत्तरप्रदेशमधील सैफई  येथे हा प्रकार घडला.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव तसेच त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांचेही घर या गावामध्येच आहे. या घटनेनंतर कुलपति (वाइस चांसलर) डॉ राज कुमार यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, विद्यापीठात विशेष स्क्वाड नेमण्यात आले आहेत. जे रॅगिंगसारख्या भयंकर घटनांवर अंकुश ठेवतील. तसेच हे स्क्वाड दोषी विद्यार्थ्यांना निलंबितदेखील करू शकतात. आम्ही अशा घटनांवर कडक नजर ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी एका रांगेत सारख्याच पेहराव आणि टक्कल केलेले दिसून येत आहेत. दुसऱ्या व्हिडीओमध्ये पुढे जाऊन ते आपल्या सिनियर असलेल्या विद्यार्थ्यांना नमस्कार करताना दिसून येत आहे.

तिसऱ्या व्हिडीओत हे विद्यार्थी सिक्युरिटी कॅबीनपासून मार्गक्रमण करत आहेत. एका सुरक्षारक्षकाला याबाबत माहिती आहे मात्र तो या विद्यार्थ्यांना काहीही करत नाहीये.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुलपती यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!