Thursday, May 2, 2024
Homeनगरकाष्टी महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत जाळ्यात

काष्टी महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत जाळ्यात

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrirampur

श्रीगोंदा तालुक्यातील (Shrigonda Taluka) बेलवंडी (Belwandi) येथील पोलीस कर्मचार्‍यांला लाच घेताना पकडल्याच्या घटनेला आठ दिवस होत नाहीत तोच लिंपणगाव (Lipangav),काष्टी महावितरणचा कनिष्ठ अभियंत्यास (Junior Engineer of Kashti MSEDCL) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) पंधरा हजारांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले.

- Advertisement -

पांडू पुनाजी मावळी (36, कनिष्ठ अभियंता, वर्ग- 3 विज वितरण कंपनी, लिंपनगाव (काष्टी 2.सेक्शन) असे लाचखोर अभियंत्याच नाव आहे. त्यास लाच घेताना लिंपणगाव (Lipangav) येथील हॉटेल श्रावणी येथे सापळा रचून रंगेहाथ अटक (Arrested) करण्यात आली. तक्रारदार यांनी गावचा पाणीपुरवठा बंद (Village water supply cut off) असल्याने गावाला पाणी मिळत नसल्याने बंद असलेला वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून विनंती केली होती. मात्र तक्रारदार यांच्याकडे वीजपुरवठा सुरळीत करायचा असेल तर वीस हजार रुपये द्या असे मावळी याने सांगितले.

यांनतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Bribery Prevention Department) तक्रार दिली होती. यात आज लाच मागणी (Bribe Demand) पडताळणीमध्ये लोकसेवक यांनी 15 हजार रूपयांची मागणी पंचासमक्ष करून हॉटेल श्रावणी, लिंपणगाव येथे स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपतचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलीस हवालदार संतोष शिंदे,विजय गंगुल, रमेश चौधरी, पो अंमलदार, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर, संध्या म्हस्के. चालक हरुन शेख. राहुल डोळसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या