Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

दंड आकारल्याचा राग म्हणत धरून उपअभियंत्याने केला पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित

Share

मेरठ | वृत्तसंस्था

नव्या वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीनंतर वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत. असेच एक प्रकरण मेरठमध्ये उघडकीस आले आहे. वाहतूक पोलिसाने दंड आकारल्याचा राग मनात धरून वीज वितरण कंपनीच्या उपअभियंत्याने पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित केल्याची घटना घडली. तब्बल तासभर चाललेल्या खडाजंगीत अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटले.

अधिक माहिती अशी की, वीजवितरणचा उपअभियंता सोम प्रकाश गर्ग हा आपल्या मोपेड दुचाकीने विनाहेल्मेट प्रवास करत होता. पुढील एका चौकीत उभ्या असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाने त्यास अडवून कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे एकही कागदपत्रे आढळून आली नाहीत.

त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने उपअभियंत्याकडून रीतसर दंड वसूल केला. दरम्यान, दंड वसूल केल्याचा राग मनात धरून या अभियंत्याने थेट पोलीस ठाण्याचेच वीज कनेक्शन खंडित केले. जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा वीज वितरण अधिकारी आणि पोलीस यांच्यात खडाजंगी झाली.  या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नमते घेत वीज कनेक्शन जोडले.

दरम्यान, वीज कनेक्शन वीजबिल थकल्यामुळे कापण्यात आल्याची माहिती वीज वितरण कडून देण्यात आली. तर परस्पर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!