Type to search

जुई म्हणते, ‘मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं’

Breaking News आवर्जून वाचाच सेल्फी

जुई म्हणते, ‘मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं’

Share

अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या निरागसतेने आणि तिच्या अभिनय कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. जुईच्या लोकप्रियतेमुळे तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.

लवकरच जुई झी युवावरील वर्तुळ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामालिकेत ती मीनाक्षी नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

19 नोव्हेंबर पासून ही मालिका प्रसारित होणार असून या मालिकेविषयी आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तिच्याशी साधलेला हा संवाद…

  1. बर्‍याच काळानंतर तू मालिकेत प्रमुख भूमिकेत पदार्पण करतेय, पुनरागमनासाठी वर्तुळ मालिका निवडावीशी का वाटली ?
  • मी टेलिव्हिजन च्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही कि हे माझं पुनरागम आहे. वर्तुळ मालिकेचं कथानक खूपच रंजक आहे आणि म्हणून हि मालिका करण्यासाठी मी लगेचच होकार दिला. मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप  आवडतं  कारण यामाध्यमाचा पसारा खूप मोठा आहे आणि तसेच यामाध्यमामुळे मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना भेटू शकते.

2. वर्तुळाची कथा वेगळीआहे, त्यातील मीनाक्षीची व्यक्तिरेखा का निवडावीशी वाटली?

  • मी नेहमीच माझ्यापेक्षा वेगळ्या असलेल्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात. आणि मीनाक्षीची व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक पातळीवर आव्हानात्मक आहे कारण याव्यक्तिरेखेच्या विविध छटा आहेत. अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणंही माझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, म्हणूनच मीही व्यक्तिरेखा स्वीकारली आणि ती निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.

3. तू मीनाक्षी शीखर्‍या आयुष्यात किती रिलेट करू शकते?

  • मीनाक्षीचे काही पैलू हे आपल्या सर्वांमध्ये असतील असं मला वाटतं. सगळ्यांमध्ये सहनशीलता, संयम आणि करुणा असते. मीनाक्षी ही एक स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे जी मी खर्‍या आयुष्यात आहे. त्यामुळे मी मीनाक्षी च्या काही पैलूंशी मी रिलेट करू शकते.

4. मालिकेचे प्रोमोज पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे, मालिकेबद्दल काय सांगशील?

  • या मालिकेचं कथानक टिपिकल सासू सून भांडण आणि फॅमिली ड्रामा असलेलं नाही आहे. ही मालिका रहस्यमय आहे. यामालिकेत थोडा ड्रामा तसंच वास्तविकता देखील आहे. आपण नेहमी म्हणतो की, आपण आयुष्यात पुढे जात असताना भूतकाळ मागे ठेवतो पण नंतर हे आहे कि भूतकाळ आपल्याला कधीच सोडत नाही आणि वर्तुळही मालिका वर्तमानकाळात डोकावणार्‍या भूतकाळाची आहे.

5.मालिकेचे प्रोमोज रिलीज झाल्यानंतर तुला तुझ्या चाहत्यांकडून किंवा इंडस्ट्रीतील तुझ्यामित्र-मैत्रिणींकडून  काय प्रतिक्रिया आल्या?

  • हो, प्रोमोज आऊट झाल्यावर माझा इनबॉक्स मेसेजेसने भरलेला होता. माझे चाहते यामालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. मला बर्‍याच जणांनी असं विचारलं कि हा हॉरर शो आहे का?त्यामुळे मला सगळ्यांना हे सांगायचंय की ही एक रहस्यमय कथा आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!