नेवासा फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; 24 जणांवर गुन्हा दाखल

0

आरोपींमध्ये नेवासा व फाट्यावरील 18 तर गंगापूरच्या तिघांचा समावेश

नेवासा (का. प्रतिनिधी) – नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सावतानगर येथील घराच्या दुसर्‍या मजल्यावर छापा टाकून तिरट जुगार खेळणार्‍या 24 जणांना नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले की, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी त्यांना मिळालेली माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळविली.

त्यांच्या आदेशानुसार श्री. गोर्डे यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, उपनिरीक्षक श्री. माळी, हेडकॉनस्टेबल गायकवाड, पोलीस नाईक सुहास गायकवाड, श्री. कचे, कुंढारे तसेच कॉन्स्टेबल गिते, गर्जे, म्हस्के, होमगार्डचे संतोष गायकवाड यांना कार्यालयात बोलावून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार नेवासा फाटा शिवारातील सावतानगर येथे संतोष अरुण जगताप याच्या राहत्या घरी दुसर्‍या मजल्यावर काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती दिली.

दोन पंचांसह पोलीस पथकाने रात्री 12.35 वाजता सावतानगरमधील घरी छापा टाकला असता तिथे बसलेला एक इसम पळून गेला व बाकी बसलेल्या इसमांना जागीच पकडले. पकडलेले सर्व 24 आरोपी तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना आढळून आले. या छाप्याच्या ठिकाणी एक लाख 90 हजार 650 रुपये रोख व जुगाराचे साहित्य तसेच जुगार खेळणार्‍यांची वाहने व मोबाईल असा एकूण चार लाख 83 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर सेकंड 529/2018 मुंबई जुगार काया कलम 4, 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. कुंढारे करीत आहेत.

जुगार खेळताना ताब्यात घेतलेले आरोपी
1) लक्ष्मीकांत सूर्यकांत सदभावे (वय 35) रा. जुन्या कोर्टासमोर नेवासा 2) गणेश कडुबाळ पंडित (वय 29) रा. जामगाव ता. गंगापूर 3) संजय रामचंद्र पोतदार (वय 45) रा. मोहिनीराज मंदिरासमोर नेवासा 4) चांगदेव अण्णा शिंदे (वय 35) रा. म्हाडा कॉलनी औरंगाबाद 5) राजेंद्र जनार्दन पवार (वय 40) रा. गंगापूर 6) अमोल सोपान बोरकर (वय 35) रा. नेवासा बुद्रुक 7) सचिन प्रभाकर शिंदे (वय 33) रा. नेवासा फाटा 8) अण्णा राधाकिसन सूर्यवंशी (वय 32) रा. मारुतीनगर, नेवासा 9) हकिम मोहम्मद शेख (वय 18) रा. नेवासा 10) अमोल दत्तात्रय जोंधळे (वय 23) रा. खळवाडी, नेवासा 11) दीपक शंकर इरले (वय 27) रा. वडारगल्ली नेवासा, 12) तुषार राजू शेंडे (वय 33) रा. भानसहिवरा ता. नेवासा, 13) काळुराम ज्ञानेश्‍वर पिटेकर (वय 25) रा. गरुटे गल्ली नेवासा, 14) किशोर रामभाऊ तट्टू (वय 36) रा. नेवासा बुद्रुक 15) संतोष अरुण जगताप (वय 36) रा. नेवासा, 16) दत्तात्रय कचरु जेजूरकर (वय 29) रा. नेवासा, 17) दिगंबर ज्ञानेश्‍वर जाधव (वय 33) रा. नेवासा, 18) बाळू उत्तम काळे (वय 35) रा. नेवासा फाटा 19) विलास पोपट जिरे (वय 32) रा. नेवासा 20) अजय सुरज गायकवाड (वय 18) रा. बसस्टॅण्ड समोर नेवासा, 21) सत्यदान देवदान मकासरे (वय 42) रा. भानसहिवरा, 22) सचिन संभाजी पठाडे (वय 28) रा. अहिल्यानगर, नेवासा, 23) प्रताप प्रकाश हांडे (वय 31) रा. नेवासा फाटा, 24) जालिंदर रंगनाथ आहेर रा. वाहेगाव ता. गंगापूर.

LEAVE A REPLY

*