भिंगार, शिवाजीनगरात जुगार अड्ड्यांवर छापे

0

नगर टाइम्स,

डीवायएसपींची रेड/ नऊ जुगार्‍यांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरात मटका, जुगाराने तोंड वर काढले आहे. नव्या दमाचे डीवायएसपींनी मात्र या बेकायदा धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. भिंगार, शिवाजीनगरमधील दोन वेगवेगळ्या अड्ड्यावर छापे टाकत 9 जुगार्‍यांना पोलिसांनी अटक केली. गुरूवारी रात्री हे धाडसत्र झाले. वैभव यशवंत बाचकर, गुरूदास बबनराव आदमाने, आशु रमेश घावरी, सुरेश बाबूराव वाघचौरे, सचिन मधुकर नवगिरे, आशिर्वाद पवने (सर्व रा.भिंगार), रमेश उर्फ बिल्लू हरिभाऊ बोरूडे (नालेगाव), प्रदिप शंकर चिल्क, विनोद एकनाथ खंडागळे ( सर्व रा.नगर-कल्याण रोड) अशी अटक केलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

भिंगार व कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागात जुगार सुरू असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोहेकॉ. सुयोग सुपेकर, हेमंत खंडागळे, महेश मगर, अभिजित अरकल, सागर व्दारके यांच्या पथकाने भिंगार येथील नेहरू मार्केट परिसरात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 6 जुगार्‍यांना अटक करत त्यांच्याकडून 22 हजार 660 रूपयांचे जुगार साहित्य व रोकड हस्तगत केली. या प्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागात सुरू असणार्‍या मटकाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 3 जणांना जुगार्‍यांना अटक करत त्यांच्याकडून 7 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघा मटका पंटरांना अटक
सावेडीत सोनी मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बोळीत मोटारसायकलवर बसून मुंबई मटक्याचे आकडे घेणार्‍या दोघा पंटरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. कुणाल महेंद्र पोटे (रा. प्रेमदान हडको) आणि शिवराज अमरसिंग सावंत (रा. विनायकनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

*