वार्ताहराला धमकीच्या निषेधार्थ ‘जर्नालिस्ट एकटीविझम’चे निवेदन

0
नाशिक : महामार्ग परिसरात पाचशे मीटरच्या आतील दारू दुकानांवर शासनाने बंदी घातली आहे. पंचवटीतील एक दारू दुकान सुरुच असल्याने परिसरातील नागरिकांनी एकत्र येत त्याविरोधात आवाज उठवला होता.

त्यानंतर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या दिल्यामुळे याच परिसरातील वार्ताहराला अज्ञाताकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज जर्नालिस्ट एकटीविझम फोरमच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे उपजिल्हाधिकारी सरिता नरके यांना निवेदन सादर केले.

यावेळी जर्नालिस्ट एक्टिविझम फोरमचे अध्यक्ष राम खुर्दळ, प्रवर्तक दादाजी पगारे, सतिश रूपवते, मायाताई खोडवे, दीपक भावसार, राजू भांड, समसद पठाण, संकेत नेवकर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*