ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांचे निधन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – ज्येष्ठ पत्रकार, संगितप्रेमी डॉ. गोपाळराव मिरीकर यांचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्रकारीता क्षेत्रातील अत्यंत महत्वाचे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. मिरीकर यांच्याकडे पाहिले जायचे. आकाशवाणीचे निवेदक म्हणून त्यांनी 1971 मध्ये दिल्ली येथे काम पाहिले व तेव्हापासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत राहिले. मराठीतील राष्ट्रीय वार्तापत्र ते दिल्लीत मांडत. देशातील धगधगता काळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणीबाणी दरम्यान डॉ. मिरिकर दिल्लीत पत्रकार म्हणून कार्यरत होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेचे नगर जिल्ह्याचे काम काही वर्षे ते पाहत होते. आकाशवाणीनंतर त्यांनी नगरमध्ये मुक्त पत्रकारीता केली. राजकीय, सामाजिक त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. नगर जिल्ह्यातील पत्रकारीता अभ्यासक्रमाची सुरूवात त्यांच्या माध्यमातून सुरू झाली. जिल्ह्यातील सहकार, पाटपाणी, शेती या विषयावर त्यांनी सखोल लिखाण केलेले आहे.

शास्त्रीय व सुगम संगितातील जाणकार म्हणून त्यांची ओळख होती. ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे संस्थापक सरदार मिरीकर यांचे ते चिरंजीव व ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे जेष्ठ बंधू होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे  निधन झाले.

LEAVE A REPLY

*