नोकरीच्या आमिषाने 32 लाखांना गंडा; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

0
नाशिक । नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून शहरातील दोघा सेवानिवृत्तांसह 16 जणांना तिघांनी सुमारे 32 लाख 37 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तीघांविरोधात वेगवेगळे दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अजीम शेख गुलाम मुस्तफा (रा.पखालरोड), जहीर शेख बनेमिया (रा.वडाळारोड) व राहुल कैलास सहाणे (रा.दगडीचाळ, रेडक्रास) अशी संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी अल्ताब बशीरखान पठाण (रा.बोधलेनगर) यांना 26 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातला. तसेच मजहर इस्माईल शेख (रा.वडाळारोड) यांनीही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलाला नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी 29 ऑक्टोबर 2016 पासून वेळोवेळी पाच लाख 87 हजार रुपये त्यांच्याकडून उकळे आहेत.

तर बल्ताब पठाण यांच्याकडून प्रथम पाच लाख रुपये उकळत सोळा जणांना नोकरीची संधी असल्याचे सांगितल्याने पठाण यांनी परिचितांकडून प्रत्येकी 50 हजार रुपयेप्रमाणे गोळा करून आठ लाख रुपये जमा करीत संशयित अजीम शेख याच्याकडे जमा केल्याचे म्हटले आहे.

त्यानंतरही संशयितांनी 14 जागांसाठी उमेदवार मिळाले नाही तर भरती होणार नाही असे सांगितल्याने पठाण यांनी पुन्हा 14 उमेदवारांचा शोध घेवून प्रत्येकी 50 प्रमाणे सात लाख रुपये जमा केले. याचकाळात अभियंता पदाची जागा असल्याचे सांगितल्याने पठाण यांनी मित्राकडून पाच लाख रुपये घेवून संशयितांना दिले. कालांतराने संशयित अजीम याने पुन्हा दीड लाखाची मागणी केली.

मात्र पठाण यांनी त्यास विरोध केला असता पैसे दे नाही तर पूर्वीचे 25 लाख रुपये घेतलेल्या उमेदवारांची कामे करणार नाही अशी धमकी दिल्याने पठाण यांनी पुन्हा दीड लाखाची जमवा जमव करीत त्यास पैसे दिले. मात्र तरही काम न झाल्याने पठाण यांनी सुमारे 26 लाख 50 हजाराची मागणी केली असता संशयितांनी पठाण यास कुटुंबियासह जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वेगवेगळी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राठोड करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*