पोलिस पाल्यांना नोकरीच्या वाटा

0
अधीक्षक शर्मा यांचा पुढाकार : रोजगार मेळाव्यात 305 जणांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, कौशल्य विकास रोजगार, उद्योजगता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नगरमध्ये सध्या कार्यरत व माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. रोजगार मेळाव्यात 304 पोलिस पाल्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाज आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्याचे उद्घाटन अधीक्षक शर्मा यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र पोलीस संचालनालय आणि कौशल्य विकास व उद्योजकता यांच्या संकल्पनेतून व निदेर्शानूसार कौशल्य विकास, उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील 15 वित्तीय कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित होते. या 15 कंपन्यांमध्ये 410 रिक्त होती. मेळाव्याला जिल्ह्यातून 375 पोली स पाल्य उपस्थित होते. यातून 305 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या उमेदवारांना मेळाव्यात संधी मिळणार नाही. त्या पाल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण व स्वयंरोजगार संधीचा लाभ घेता येणार आहे. मुळात मेळाव्याचा उद्देशच आजी-माजी पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी शासनाचे विविध महामंडळामार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करणे व नोकरीस पात्र उमेदवारांना विविध कंपन्यामध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देणे हा होता. मेळाव्याला स्वयंरोजगार सहाय्यासाठी महात्मा फुले विकास महामंडळ, जिल्हा खादी ग्राम उद्योग, अपंग विकास महामंडळ व इतर मागासवर्ग महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ या 5 महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याकडे 58 पोलीस पाल्यांनी नोंदणी केली.
यावेळी सहाय्य पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपअधीक्षक नगर शहर अरुण जगताप, ग्रामीणचे आनंद भोईटे, नगर ग्रामीण उपविभागाचे संपत चाटे, कौशल्य विकास व रोजगारचे नारायण वाघारे, विजय दाणी, राखीव पोलिस निरिक्षक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक फौजदार गीता कळमकर यांनी केले.

375 पाल्यांची उपस्थितीत
मेळाव्यासाठी जिल्ह्यातून 375 उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांची चाचणी व मुलाखती घेवून विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी यापैकी 305 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. तर, रोजगारभिमुख मोफत प्रशिक्षणासाठी 90 उमेदवारांची निवड करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

LEAVE A REPLY

*