दिवाळीनिमित्त रविवारी ‘जीवन संगीत’ मैफिलीचे आयोजन

0

अहमदनगर : नगरमध्ये दिवाळीच्या काळात एक दिवाळी, पहाट वेळी ही संकल्पना रुजवणार्‍या व यानिमित्ताने मागील 12 वर्षांपासून दिवाळी पहाटेच्यावेळी संगीत मैफिलीचे आयोजन करणार्‍या चैतन्य फाउंडेशनने येत्या रविवारी (15 ऑक्टोबर) सकाळी साडेसहा वाजता सावेडीच्या माऊली सभागृहात ‘जीवन संगीत’ या मैफिलीचे आयोजन केले आहे. नामवंत युवा कलावंत ऋषिकेश व प्राजक्ता रानडे या मैफिलीत विविध प्रकारच्या मराठी गीतांचे सादरीकरण करणार आहेत.

ही मैफल सर्व संगीत रसिकांसाठी खुली आहे. यंदाची दिवाळी सोमवारी (16 ऑक्टोबर) वसुबारस पूजनापासून सुरू होत आहे. मात्र, दिवाळीच्या काळात सर्वांचीच लगबग सुरू असल्याने दिवाळी आधी म्हणजे रविवारी (15 ऑक्टोबर) सकाळी साडेसहा वाजता जीवन संगीत-मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीफचे नियोजन चैतन्य फाउंडेशनने केले आहे.

ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांची नातसून असलेल्या दर्शना जोग व त्यांचे सहकारी या मैफिलीचे संगीत संयोजन करणार आहेत तर मिलिंद कुलकर्णी निवेदन करणार आहेत.

LEAVE A REPLY

*