Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या राजकीय

जितेंद्र आव्हाड यांनी साईबाबांचे दर्शन घ्यावे; अब्दुल सत्तारांनी श्रध्दा अन् सबुरीचा दिला सल्ला

Share

नाशिक । प्रतिनिधी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आव्हान दुर्देवी असून त्यांनी सत्तेत असल्याचे भान बाळगावे. शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन आव्हाडांनी श्रध्दा अन् सबुरीने वागावे, असा सल्ला ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आव्हाड यांना दिला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे आयोजित केलेल्या विभागीय आढावा बैठकीनंतर सत्तार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याचे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांचे हे विधान चुकीचे आहे.

ते देखील कधीकाळी काँग्रेसमध्ये होते हे ते विसरले असतील. आता जरी ते राष्ट्रवादीत असले तरी ते महाविकास आघाडीेचे मंत्री आहेत, हे विसरता कामं नये.एखाद्या पक्षाच्या प्रमुखांबाबत असे विधान करतांना त्याचा काय परिणाम होइल याचा विचार त्यांनी करायला हवा होता. त्यांनी शिर्डीला जावून साईंचे दर्शन घ्यावे अन त्यांच्या शिकवणीनुसार श्रध्दा अन सबुरी ठेवावी असा सल्लाही सत्तार यांनी दिला.

आझमी यांनी अयोध्याला यावे

अबू आझमी यांचे पुत्र फरहान यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौर्‍यावर केलेल्या टिकेला देखील सत्तार यांनी उत्तर दिले. फरहान यांनी आमच्या सोबत अयोध्येला यावे. पण येतांना जात पात धर्म हा भेदभाव बाजूला ठेवून एकत्र यावे. त्यांनी तसे केल्यास नक्कीच त्यांचे स्वागत करु असे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!