अशी असेल जुलैनंतर जिओची नवी ऑफर

0

मुंबई | रिलायन्स जिओची ऑफर अखेरच्या टप्प्यात आहे. या महिन्याच्या शेवटी मोफत देण्यात आलेली ऑफर आता संपणार असून या पार्श्वभूमीवर रिलायन्सकडून आता वेगवेगळ्या ऑफर सादर करण्यात आल्या आहेत. जिओने धन धना धन या नावानेच ही ऑफर सादर केली असून ऑफरमध्ये ठराविक बदल करण्यात आले आहेत.

जिओच्या या नव्या प्लॅनचा फायदा घेण्यासाठी जिओच्या ग्राहकांना प्राइम मेंबरशिप असणे अनिवार्य असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अशी असेल जिओची ऑफर

19 रूपये : अमर्यादित व्हॉईस कॉल, 200 एमबी डेटा एक दिवस वैधता.

49 रूपये : अमर्यादित व्हॉईस कॅालिंग व 600 एमबी डेटा, 3 दिवस वैधता.

96 रूपये : अमर्यादित व्हॉईस कॉल आणि एसएमएस, दररोज 1 जीबी 4 जी डेटा. 7 दिवस वैधता.

149 रूपये : अमर्यादित कॉल, 300 एसएमएस मोफत. 2 जीबी 4 जी स्पीड डेटा, 28 दिवस वैधता.

309 रूपये : यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल. दररोज 1 जीबी डेटा. 56 दिवस वैधता.

349 रूपये : सर्व सुविधा अमर्यादित शिवाय 20 जीबी 4 जी डेटा. यामध्ये दररोज डेटा वापरण्यावर कोणतीच मर्यादा नाही. 56 दिवस वैधता.

399 रूपये : प्रतिदिन 1 जीबी 4 जी डेटा. अमर्यादित कॉल आणि एसएमएस. 84 दिवस वैधता.

LEAVE A REPLY

*