उद्यापासून जिओफोन २चा फ्लॅशसेल

0
नवी दिल्ली-बहुप्रतिक्षित जिओफोने २ साठी फ्लॅशसेल उद्यापासून म्हणजेच 16 ऑगस्टपासून सुरू होत आहे. यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी किंमत आहे. उद्या गुरुवार दुपारी 12 वाजेपासून Jio.com आणि माय जिओ अॅपवर सेलला सुरूवात होईल

या फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत. जिओ फोन मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जिओ युजर्स अवघ्या ५०१ रुपयांमध्ये त्यांचा जुना फोन बदलू शकणार आहे.

LEAVE A REPLY

*