Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मार्केट बझ मुख्य बातम्या

Video : तरीही जिओ स्वस्तच; पैसे आकारण्यावरून ग्राहकांना जिओचे स्पष्टीकरण

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

रिलायन्स जिओने अलिकडेच ग्राहकांच्या आउटगोइंग कॉल्सवर शुल्क लावण्यास सुरुवात केली आहे. जिओ व्यतिरिक्त इतर कुठल्याही नेटवर्कवर कॉल केल्यास ६ पैसे प्रतिमिनिट इंटरकनेक्ट युजेस शुल्क कंपनीकडून लागून करण्यात आला आहे.

जिओकडून हा नवा नियम १० ऑक्टोबरपासून प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना लागू करण्यात आला आहे. पण १० ऑक्टोबरपूर्वी केलेल्या रिचार्जची वैधता संपल्यावरच ग्राहकांना नवे शुल्क लागू होती अशी माहिती कंपनीने दिली आहे.

जिओने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. कंपनीकडून वेगळे व्हाउचर्स सुरू करण्यात आले आहेत. जिओ या व्हाऊचरसोबत ऑऊटगोइंग कॉल्सवरील शुल्काने नाराज होती यासाठी विशेष इंटरनेट देण्याचे जाहीर केले आहे.

तसेच जिओच्या प्रेमात पडलेल्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी जिओकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यानुसार अर्ध्या तासाच्या कॉलसाठी जिओच्या ग्राहकांना १.८० रुपये शुल्क द्यावेल लागते तर इतर कंपन्या इतक्याच कालावधीसाठी ४५ रुपये घेतात असे सांगत जिओ किती स्वस्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!