Jio DTH : रिलायन्स जिओच्या डीटीएचसाठी नोंदणी सुरू?

1

रिलायन्स डीटीएच सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

काही महिन्यांपूर्वी रिलायन्स डीटीएच बॉक्सचा फोटो लीक झाल्याने ही सेवा या वर्षांत लाँच होणार असल्याची चर्चा होतीच.

त्यातून ‘जनसत्ता डॉट कॉम’  आणि generatewish.com ने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स जिओच्या डीटीएच सेवेसाठी नोंदणीही सुरू झाली आहे.

या बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार डीटीएच सेवा लाँच झाल्यानंतर सुरूवातीचे सहा महिने ती मोफत असणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ४३२ चॅनल पाहता येणार आहेत.

त्यातले ५० चॅनेल हे एचडी असणार आहेत. या सेवेची नोंदणी करण्यासाठी नाव, फोन क्रमांक, राज्य अशी माहिती भरणं आवश्यक असणार असल्याचे म्हटले आहे.

रिलायन्सने ही सेवा कोणत्या तारखेला लाँच होणार, याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. पण ‘जिओ केअर नेट’च्या नवीन अपडेटनुसार जुलै महिन्यात ही सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*