५ रुपयांच्या चॉकलेटवर १ जीबी डेटा फ्री

0
मुंबई : नवनवीन ऑफरसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘जिओ’ने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा एक आकर्षक आणि भन्नाट ‘ऑफर’ आणली आहे. रिलायन्स जिओचे दुसऱ्या वर्षात पदार्पण होत असून यानिमित्त कंपनीनं ग्राहकांना खूश करण्यासाठी ५ रुपयांच्या कॅडबरीवर १ जीबी डेटा फ्री देणाचं ठरवलं आहे.

रिलायन्स जिओने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. जिओच्या एंट्रीनंतर इंटरनेट आणि कॉलिंग पॅकेजसाठी सर्वच कंपन्यांमध्ये तुफान स्पर्धा सुरु झाल्याचे आपण पाहात आहोत. मात्र, रिलायन्स जिओने सर्वांपुढे आघाडी घेत आपले स्थान अबाधित आणि कायम ठेवले आहे. रिलायन्स जिओच्या एंट्रीला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कंपनीने ग्राहकांचे तोंड गोड करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच, डेअरी मिल्क कॅडबरीच्या खरेदीवर चक्क 1 जीबी डेटा मोफत देऊन ग्राहकांशी गोडवा जपण्याचं काम जिओने केलं आहे.

केवळ जिओ ग्राहकांसाठी ही ऑफर असून फ्री डेटा मिळवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये MyJio अॅप असणं गरजेचं आहे. फ्री डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांनी फक्त ५ रुपयांची कॅडबरी, डेअरी मिल्क, डेअरी मिल्क क्रॅकर, डेअरी मिल्क रोस्ट आलमंड, डेअरी मिल्क फ्रूट अँड नट किंवा डेअरी मिल्क लिकेबल्सचा रिकामा रॅपर्स असायला हवा. मायजिओच्या अॅपवरील होमस्क्रीनवर एक बॅनर दिसत असून त्यावर फ्री डेटाची ऑफर आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पार्टीसिपेट नाउ हे बटन दिसेल. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री डेटासाठी डेअरी मिल्क चॉकलेटच्या आत असलेला रॅपर बारकोड स्कॅन करावा लागेल. हा सर्व सोपस्कार पार पा़डल्यानंतर तुम्हाला १ जीबी डेटा मिळेल.

१ जीबी डेटा फ्री मिळवण्यासाठी ५ रु, १० रु, २० रु, ४० रु, आणि १०० रुपयांच्या कॅडबरी मिल्कच्या रॅपरचा वापर करता येईल. कॅडबरीवरील मिळणारा डेटा हा तुमच्या डेटाव्यतिरिक्त असेल. तसेच तुम्हाला मिळालेला डेटा तुम्ही ट्रान्सफर सुद्धा करू शकतात. ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत असून एका व्यक्तीला एकदाच १ जीबी डेटा मिळवता येईल.

LEAVE A REPLY

*