Type to search

ब्लॉग

Blog : जेट विमानानिशी आकाशाशी फाईट देणारी फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंग

Share

‘चूल आणि मूल’ ही भारतीय स्त्रीची ओळख न विसरता भारतीय स्त्री आपली नवी ओळख निर्माण करू लागली आहे. जमिनीवरची स्त्री आकाशाला गवसणी घालू लागली तीही विमान चालवून. ती एवढ्यावरच न थांबता आता लढाऊ महिला वैमानिक म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. भारतीय वायुसेनेतील जेट विमान उडवून शत्रूशी दोन हात करण्यास ती सज्ज झाली आहे. जेट हे लढाऊ विमान उडविण्याचा पहिला मान मिळविणारी पहिली भारतीय महिला वैमानिक ठरली आहे ती फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंग. गेल्या 30 मे 2019 रोजी तिने हा पराक्रम केल्याचे हवाईदलाकडून 31 मे रोजी घोषित करण्यात आले. मोहनासिंगचे वडील सुद्धा भारतीय हवाईदलात आहेत.

फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंगने प्रशिक्षणादरम्यान 380 तास हॉक विमान उड्डाण केले आहे. 2016 मध्ये मोहना सिंग, भावना कांत आणि अवनी चतुर्वेदी या महिला तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात भारतीय वायुसेनेमध्ये दाखल झाल्या. त्यातील फ्लाइट लेफ्टनंट मोहना सिंग ही जेट हॉक विमान मिशन पूर्ण करणारी पहिली महिला पायलट बनली आहे. गेल्या आठवड्यात फ्लाईट लेफ्टनंट अर्थात् कांट एमआयजी-21 बिसन उडविणारी ती पहिली महिला पायलट बनली. शुक्रवारी वायुसेनेने सांगितले की मोहनाने पश्चिम बंगालच्या कालीकुंडा वायुसेना स्टेशनवर यशस्वीपणे लष्करी विमान उडविले. यासह तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले. वायुसेनेनुसार, मोहना आता ‘एअर टू एअर’ आणि ‘एअर टू ग्राउंड’ अभियानासाठी तयार आहे. प्रशिक्षण दरम्यान रॉकेट्स आणि उच्च क्षमता बॉम्ब टाकण्याचे तिला प्रशिक्षण देण्यात आले.

दरम्यान, मोहनाने 500 तास उड्डाण केले, ज्यामध्ये हॉक विमान एमके 132 हे 380 तास चालले. जून 2016 मध्ये, फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंग, फ्लाइट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत यांना वायुसेनेच्या लष्करी पायलट म्हणून समाविष्ट करण्यात आले. भारताच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे या घटनेवरून सिद्ध होते. आकाशात विमान उडविणार्‍या पहिल्या महिला वैमानिक म्हणून सौदामिनी देशमुख यांनी मान मिळविल्यानंतर पहिल्या लढाऊ विमान उडविणार्‍या महिला वैमानिक म्हणून फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंग यांनी मान मिळविला. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी भारताची स्थिती असताना मोहना सिंगने मिळविलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. त्या आता प्रत्यक्ष युद्धात भाऊ घेऊ शकतील. त्यांच्या या कामगिरीचे मूल्यमापन करायचे झाल्यास केवळ शौर्य या एकाच चष्म्यातून पाहिले जाऊ नये. भारतात महिलांना समान संधी मिळते हे जगाला भारताने कृतीने दाखवून दिले आहे. त्यामुळे भारताला नावे ठेवणार्‍यांची या घटनेमुळे आपोआपच दातखीळ बसली आहे.

– प्र. के. कुलकर्णी,
   7448177995

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!