Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश नाशिक मुख्य बातम्या

जेट एअरवेजचे दहा महिन्यात 32 हजार प्रवासी, 207 मेट्रीक टन माल वाहतूक; विमानसेवा बंदमुळे गैरसोय

Share

नाशिक । रवींद्र केडिया

जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांसह शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पर्यटक लगतच्या विविध शहरांचा आधार घेत प्रवास करत असले तरी शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहत असल्याने तो सोडवण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचा सूूर उमटत आहे.

भारत सरकारने ‘उडान’ योजनेअंतर्गत देशभरातील शहरांना विमानसेवेने जोडण्याचा संकल्प केला होता. यासाठी प्रवाशांना सवलतीच्या दरात काही तिकिटे राखून ठेवण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर जेट एअरवेजने 15 जून 2018 साली 168 सीटर विमान नाशिक-दिल्लीसाठी सुरू केले होते. या विमानसेवेला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद लाभला होता. केवळ प्रवासी वाहतूकच वाढली नव्हती तर त्यासोबतच कार्गोसेवाही गतिमान झाली होती.

मात्र, अचानक आलेल्या आर्थिक अडचणींमुळे जेट एअरवेजने विमानसेवा 15 एप्रिल 2019 पासून खंडित केली. त्यामुळे नियमित दिल्लीसाठी प्रवास करणारे तसेच दिल्लीहून थेट परदेशी विमानसेवा घेणार्‍या पर्यटकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

देशभरातील विविध शहरांच्या विमानसेवांना पर्यायी सेवांशी जोडून ‘स्लॉट’ जोडून देण्यात आले, मात्र नाशिकसाठी तसा पर्याय न आल्याने प्रवाशांसह शेतकरी बांधवांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शेतकर्‍यांची झाली अडचण

विमान सेवेच्या माध्यमातून दोन दिवसात एक हजार टन भाजीपाला फळ व फूले देशाच्या इतर शरात जात होते.त्यात प्रामुख्याने स्ट्रॉबेरी, डाळींब, खरबूज, कलिंगडे तसेच शेवंती गुलाब या फूलांना मागणी मिळू लागली असल्याचे जानोरीचे शेतकरी गणेश वाघ यांनी सांगितले. शेतकरी बांधवांना ही सेवा मोठा आधार होती. विमानसेवाच बंद झाल्याने शेतकर्‍यांची अडचण निर्माण झालेली असल्याची खंत गणेश वाघ यांनी व्यक्त केली.

शेतीमालाची पुन्हा परवड

शेतकरी बांधवांना दिल्लीसह जगभरातील बाजारपेठ सहज उपलब्ध होत असल्याने विमानसेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न रुळू लागला होता. विमानसेवा सुरू झाल्यापासून गेल्या 10 महिन्यांत 207.56 मेट्रिक टन शेतीमालाची वाहतूक या विमानसेवेद्वारे केली गेली. पर्यटकांनी पर्यायी सेवांचा वापर सुरू केला, मात्र शेतीमालाला या प्रकारचे ‘हॉपिंग’ करणे शक्य होणार नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. पुन्हा मुंबईची वाट धरण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याने त्यांची परवड सुरू झाली असल्याचे चित्र आहे.

नाशिकला क्षमता असतानाही विमानसेवेबाबत लक्ष दिले जात नाही. ते देण्याची गरज आहे. शेतकरी व उद्योजकांच्या माध्यमातून व्यापार उद्योग विस्तारासाठी गरजेचे आहे.

– मनीष रावल ( कार्यकारिणी सदस्य, निमा)

जेटचे 32 हजार प्रवासी 

विमानसेवा सुरू झाल्यापासून मागील दहा महिन्यांत नाशिक-दिल्लीदरम्यान सुमारे 32125 प्रवाशांनी लाभ घेतला. याचाच अर्थ प्रवाशांच्या क्षमतेबद्दल शंका नाही. दिल्लीसाठी सध्या लोक मुंबई हा पर्याय निवडत आहेत. त्यासोबतच काही प्रवासी नाशिकमधून सुरू असलेल्या अहमदाबाद व हैदराबाद विमानसेवांच्या माध्यमातून त्या शहरातून ‘हॉपिंगद्वारे’ दुसर्‍या विमानाने दिल्ली गाठत आहेत. मात्र या द्रविडी प्रणायामातून मुक्तीसाठी पर्यायी सेवा देण्याची मागणी उद्योग व व्यापारीवर्गातून केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!