या कारणाने बिल गेट्स पुन्हा बनू शकतात जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती

0
वॉशिंगटन : तब्बल १३७ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या जेम बेझॉसला मित्राच्या पत्नीशी प्रेमप्रकरण करणं चांगलंच महागात पडणार आहे. बेझॉसचा त्याची पत्नी मॅकेन्झी हिच्याशी घटस्फोट होत असून घटस्फोटात अर्धी संपत्ती दिल्यानंतर बेझॉस बिलगेट्सहूनही गरीब होणार आहे तर मॅकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत महिला होणार आहे.

५४ वर्षीय जेस बेझॉस लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात पडले आहेत. लॉरेन माजी न्यूज अँकर आणि हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून ओळख आहे. सांचेझही तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. हॉलिवडू चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या पॅट्रीक व्हाईटसेलबरोबर तिचे लग्न झाले होते.

सॅन्चेझ ही बेझॉसचा मित्र पीटर व्हाइटशेल याची पत्नी आहे. पण अनेक वर्षांपूर्वी ते दोघं विभक्त झाले आहेत. सान्चेझ-बेझॉसचं प्रेमप्रकरण मॅकेन्झीला मानवलं नाही आणि तिने घटस्फोटाची मागणी केली.

बेझॉस-मॅकेन्झी वॉंशिंगटनचे नागरिक आहेत. वाँशिंगटनच्या कायद्यानुसार घटस्फोट झाल्यावर विवाहानंतर कमवलेल्या संपत्तीची दोघांमध्ये समान वाटणी केली जाते. यामुळे घटस्फोटानंतर बेझॉसला ६९ अब्ज डॉलरची तर मॅकेन्झीला तितकीच संपत्ती मिळणार आहे.

घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या ९२.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

LEAVE A REPLY

*