Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात!

जेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात!

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणू संसर्गामुळे केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अभियांत्रिकी प्रवेशांसाठीची जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा स्थगित केली होती. आता ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

- Advertisement -

यंदा जेईई मेन्स 5, 7, 9 आणि 11 एप्रिलला घेण्यात येणार होती. मात्र, देशात करोना विषाणू संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले.

त्यात 21 दिवसांची संचारबंदी देशभर लागू करण्यात आली. त्यामुळे नियोजित जेईई मेन्स स्थगित करावी लागली. त्यामुळे आता जेईई मेन्स कधी होणार, त्यापुढे प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर, एनटीएने जेईई मेन्सच्या आयोजनाबाबत माहिती देणारे परिपत्रक मंगळवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन जेईई मेन्स मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात प्रस्तावित आहे.

पुढील काही आठवडयात परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. परीक्षेची प्रवेशपत्रे 15 एप्रिलनंतर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे एनटीएने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या