उपराष्ट्रपती निवडणूकीत नितीश कुमार कॉंग्रेससोबतच

0
उपराष्ट्रपती निवडणूक जवळ आली आहे. भाजपसोबत आता नितीश कुमार यांचा जेडीयु पक्षदेखील आहे पण नितीश कुमार यांचा भाजपचे उमेदवार वैंकय्या नायडू यांना पाठींबा नसून कॉंग्रेसचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांना आहे.

जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार उपराष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेससोबत जाणार असल्यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

जेडीयू जेव्हा लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी यांच्यासोबत होती तेव्हा कॉंग्रेस मिळून महायुती झाली होती. त्याच वेळी नितीश कुमार यांनी गांधी यांना पाठींबा दिला होता.

पण आता नितीश कुमार भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री आहेत तरीदेखील  जेडीयुकडून पुन्हा एकदा उपराष्ट्रपती निवडणुकीत गांधी यांनाच मतदान करणार असे सांगण्यात आले असल्यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

LEAVE A REPLY

*