Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

जायकवाडी धरणावर हायअलर्ट

Share

गुप्तचर विभागाच्या इशार्‍यानंतर परिसरात 24 तासांचा खडा पहारा

मुंबई – मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशार्‍यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. तर धरणावरील पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून, या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.

पूर्वी धरणावर चार पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. आता जायकवाडी धरणावर 12 सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीनेही खासगी सुरक्षा गार्ड वाढवून सर्व बाजूच्या चौक्यावर 24 तासांचा खडा पहारा ठेवणार असल्याची माहिती एका अधिकार्‍यांनी दिली आहे. तर लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तामिळनाडूत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर देशातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी

करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवरही धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशार्‍यानंतर पोलिसांनी आता खासगी व्यक्तींना धरणावर जाण्यास बंदी केली आहे. तसेच शासकीय कर्मचारी यांनासुद्धा गेटवर ओळखपत्राची खात्री झाल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आधीसुद्धा जायकवाडी धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एटीएसकडून जलसंपदा विभागाला पत्र देण्यात आले होते.

नव्याने प्रवेश केलेल्यांसाठी..

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेले जायकवाडी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे नुकतेच 90 टक्के भरले आहे. जायकवाडी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशार्‍यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!