Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जायकवाडीत मृतसह एकूण 46.6 टीएमसी साठा

Share

गोदावरीचा विसर्ग घटला; 1 लाख 23 हजार 941 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव (वार्ताहर) – पावसाचा जोर काल दिवसभर काहीसा कमी असल्याने धरणातील आवक घटल्याने विसर्ग घटविण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरीतील नांदूरमधेश्‍वर बंधार्‍यातून पडणारा विसर्गही काल रात्री 10 वाजता 1 लाख 23 हजार 941 क्युसेकवर आहे. विसर्ग घटला असला तरी गोदावरी पात्राची महापुराची स्थिती जैसे थे आहे! काल सकाळी 6 पर्यंत 1 जूनपासून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून 48.7 टिएमसी इतका विसर्ग करण्यात आला. खाली जायकवाडीला काल रात्री 9 च्या आकडेवारी नुसार मृतसह एकूण साठा 46.6 टिएमसी इतका झाला होता. तर उपयुक्तसाठा 20.5 टिएमसी होता. या धरणातील उपयुक्तसाठा 26.86 टक्के इतका झाला आहे.

रविवारी रात्री 12 वाजता गोदवरीतील विसर्ग 2 लाख 91 हजार 525 क्युसेक इतका वेगाने सुरू होता. या पाण्यामुळे नदीपात्र अनेक ठिकाणी सोडून महापुराचे पाणी अनेक ठिकाणी गावात, शहरात घुसले होते. काल उशीरापर्यंत हे पाणी पात्र सोडून वाहत होते. वरील विसर्ग काल सकाळी 5 वाजेपर्यंत टिकून होता. वरील धरणांच्या पाणलोटातील पाऊस मंदावल्याने आवक घटल्याने धरणातील विसर्ग काहीसे घटल्याने गोदावरीतील विसर्ग काल सकाळी 5 वाजता तो 2 लाख 76 हजार 605 इतका करण्यात आला. सकाळी 7 वाजता 2 लाख 69 हजार 298 क्युसेक इतका करण्यात आला.

8 वाजता 2 लाख 34 348 करण्यात आला. 9 वाजता 1 लाख 96 हजार 132 वर विसर्ग आणण्यात आला. 10 वाजता 1 लाख 93 हजार 143 क्युसेक, 11 वाजता 1 लाख 84 हजार 369 क्युसेकवर आणण्यात आला. दुपारी 12 वाजता 1 लाख 70 हजार 405 क्युसेक इतका कमी करण्यात आला. दुपारी 1 वाजता 1 62 हजार 439 क्युसेक इतका करण्यात आला. दुपारी 2 वाजता 1 लाख 57 हजार 409 क्युसेक इतका करण्यात आला. 2 वाजता 1 लाख 57 हजार 409, 3 वाजता 1 लाख 47 हजार 500, 4 वाजता 1 लाख 42 हजार 829 क्युसेक, 5 वाजता तो 1 लाख 40 हजार 556 6 वाजता 1 लाख 36 हजार 133 क्युसेक, सायंकाळी 7 वाजता 1 लाख 33 हजार 988 क्युसेक, रात्री 8 वाजता 1 लाख 31 हजार 886 क्युसेक व रात्री 9 वाजता 1 लाख 25 हजार 525 क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. रात्री 10 वाजता तो 1 लाख 23 हजार 941 आणण्यात आला. गोदावरीतील या पाण्याला प्रचंड वेग होता.

धरणातील विसर्ग!
काल रात्री 9 च्या आकडेवारीनुसार दारणातुन 32 हजार 136 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येत होता. गंगापूर मधुन 8 हजार 973 क्युसेक, कडवातुन 16 हजार 478 क्ुयसेक, भोजापूर मधून 2 हजार 800 क्युसेक, आळंदीतुन 3 हजार 531 क्ुयसेक, वालदेवीतुन 2 832 क्युसेक, भावलीतुन 948 क्युसेक, पालखेड मधुन 15 हजार 966 क्युसेक, कश्यपी 844 तर गौतमी गोदावरीतुन 850 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येत होता.

धरणातील एकूण विसर्ग
1 जून पासुन काल सोमवारी सकाळी 6 पर्यंत नाशिक जिल्ह्यातील धरणातुन झालेले विसर्ग असे- दलघफू कंसात टिएमसी – दारणा- 13 हजार 260 दलघफू टिएमसी), गंगापूर- 6654 दलघफू (6.6 टिएमसी), नांदूरमधमेश्‍वर बंधारा -48 हजार 778 (48.7 टिएमसी), कडवा- 4810 दलघफू (4.8 टिएमसी), भोजापूर 501 दलघफू (0.5 टिएमसी), वालदेवी -335 दलघफू (0.3 टिएमसी), गौतमी गोदावरी- 1297 दलघफू (1.2 टिएमसी), आळंदी – 817 दलघफू (0.8 टिएमसी), भावली 908 दलघफू (0.9 टिएमसी).

24 तासांतील पाऊस
धरणांच्या काल सकाळी संपलेल्या 24 तासातील पाऊस, कंसात 1 जून पासुनचा एकूण पाऊस,आकडे मिमी मध्ये – नाशिक-145 (1101), दारणा- 176 (1419), घोटी- 251 (2267), त्र्यंबक- 396 (2871), गंगापूर 202 (1931), मधमेश्‍वर 105 (397), पालखेड 103 (404), कडवा 107 (1113), मुकणे 166 (1596), कश्यपी 246 (1479), इगतपूरी 368 (3640), अंबोली 425 गौतमी गोदावरी 259 ()1660, भावली 410 (4067), वालदेवी 35 (579), वाकी 320 (2759), भाम 216 (2254).
लाभक्षेत्रातील पाऊस- कंसातील आकडे एकूण पाऊस- कोपरगाव 39 (413), पढेगाव 42 (269), सोमठाणा 129 (508), कोळगाव 66 (346), सोनेवाडी 31 (176), शिर्डी 43 (236), राहाता 30 (200), रांजणगाव 22 (234), चितळी 20 (137) पाउस काल सकाळी संपलेल्या 24 तासात नोंदला गेला.
दारणा, गंगापूरच्या पाणलोटात पावसाचा धुव्वाधार पणा काहिसा कमी झाला असला दमदार पणा पावसात होता. काल दिवसभरातील 12 तासात दारणाला 94 मिमी, भावलीला 116 मिमी, गंगापूरला 45 मिमी, कश्यपीला 38 मिमी, गौतमीला 49 मिमी, त्रंबकला 70 मिमी, व अंबोलीला 75 मिमी पावसाची झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!