Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जायकवाडीत 5320 क्युसेकने पाण्याची आवक

Share

अस्तगाव (वार्ताहर)- गोदावरीत नांदूरमधमेश्‍वर ंबंधार्‍यातुन काल सकाळी अवघा 1614 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. तो काल दुपारी वाजता 3228 क्युसेक इतका करण्यात आला. गंगापूर धरणातील विसर्ग दोन दिवसांपासुन बंद होता. ते 520 क्युसेक ने सोडण्यात येवु लागला आहे. खाली जायकवाडीत मृतसह एकूण साठा 96.3 टिएमसी इतका झाला आहे. तर गोदावरीतुन जायकवाडीच्या दिशेने 85.7 टिएमसी इतके पाणी वाहिले आहे.

नाशिक जिल्ह्यात सह्यद्रिच्या घाटमाथ्यावर गेल्या 5-6 दिवसांपासुन पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तुरळक सरी येवुन जातात, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचाही पाउस पडत आहे. त्यामुळे गंगापूर धरणाचे दरवाजे तीन दिवसांपुर्वी बंद करण्यात आले होते. मात्र काल सकाळी 9 वाजता पुन्हा या धरणातुन 520 क्युसेक ने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. दारणातुनही 1100 वर आलेला विसर्ग काल 2602 क्युसेक इतका करण्यात आला होता. भोजापूर मधुन अवघा 38 क्युसेक, आळंदीतुन 86 क्युसेक, वालदेवीतुन 241 क्युसेक, भावलीतुन 208 क्युसेक, असा विसर्ग सुरु आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 11, भावलीला 48, इगतपूरीला 34, गंगापूरला 28, कश्यपीला 15, त्र्यंबकला 35 तर अंबोलीला 44 मिमी पावसाची नोंद झाली. खाली नादूरमधमेश्‍वर बंधार्‍यात वरील धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने 1614 क्युसेक वर आलेला विसर्ग काल दुपारी 12 वाजता 3228 क्युसेक इतका करण्यात आला. हा रात्री उशीरा पर्यंत टिकून होता. 1 जून पासुन काल सकाळी 6 वाजेपर्यंत या बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतुन 85.7 टिएमसी इतके पाणी वाहुन गेले आहे.

जायकवाडी जलाशयात उर्ध्व धरणातुन पाण्याची आवक घटली आहे. काल संध्याकाळी 7 च्या आकडेवारी नुसार 5350 क्युसेक ने पाण्याची आवक सुरु होती. या जलाशयात 70.2 टिएमसी उपयुक्त साठा तयार झाला होता. तर मृतसह एकूणसाठा 96.3 टिएमसी इतका आहे. तर टक्केवारी 91.67 टक्के इतका आहे. परवा गुरुवारी या धरणातुन नदी गेट ने 1048 क्युसेक ने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. हा विसर्ग काल सकाळी 9 वाजता काहिसा वाढवततो 4192 क्युसेक इतका करण्यात आला आहे. जायकवाडीच्या 8 नदी गेटमधुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पाच्या गेटमधुन 1589 क्युसेक, जायकवाडीच्या उजव्या कालव्यातुन 900 तर डाव्या कालव्यातुन 1400 क्युसेक ने विसर्ग सोडणे सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!