Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

जायकवाडी ५४ टक्के भरले; सिंचनासाठीही होणार पाण्याचा उपयोग

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या आठवड्यापासून नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला महापूर आला होता. गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करून पाणी जायकवाडी धरणात पोहोचले आहे. आतापर्यंत जायकवाडी धरण ५४ टक्के भरले असून अजूनही नाशिकमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने जायकवाडीची पाण्याची पातळी वाढणार आहे.

जायकवाडी किती भरले? हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. यंदा नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.  ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी ५४ टक्के भरले असून  ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरू शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जायकवाडीत ३५ टक्के पाणी पिण्यासाठी राखीव आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात दुष्काळ परिस्थितीवर मात करता येणार असून येथील शेतकरी समाधानी आहे.

जायकवाडी धरणाच्या पाण्याची पातळी 1512.47 फुट व 461.001मी. इतकी आहे. पाण्याची आवक 177777.62 क्युसेक झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा 1917.444 दलघमी असून यात 1179.338 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे.

आज प्रशासनाकडून देण्यात आलेल्या पाणीसाठ्यात धरण ५४.३२ टक्के भरले असून अजूनही नाशिकच्या गंगापूर धरणासह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!