जायकवाडीत 36 टीएमसी उपयुक्त साठा

0

गोदावरीतून वाहिले 31.2 टीएमसी पाणी

अस्तगाव (वार्ताहर) – नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून काल सकाळी 6 वाजेअखेर गोदावरीत जायकवाडीच्या दिशने 31.2 टीएमसी इतका विसर्ग करण्यात आला. खाली जायकवाडीत काल रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत उपयुक्त साठा 36.1 टीएमसी इतका झाला होता. हे धरण 47.1 टक्के भरले आहे. दरम्यान दारणाचा विसर्ग 3592, गंगापूरचा विसर्ग 2055, कडवाचा 1518 तर भोजापूरचा 539, वालदेवीचा 1050 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हे पाणी खाली नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात येत असल्याने गोदावरीत या बंधार्‍यात काल सायंकाळी 8 वाजता 12620 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असल्याने धरणात नवीन येणार्‍या पाण्याची आवक घटली असल्याने विसर्ग ही घटविण्यात आले आहेत. दारणात मात्र काल सकाळी 6 वाजता 2628 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तो काल रात्री 8 वाजता 3592 क्युसेकने सुरु होता. गंगापूर धरणाचा मात्र काल सकाळी 4202 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग रात्री आठ वाजता 2055 ने सुरु होता. कडवाचा सकाळी 6 वाजता 760 ने सुरू होता. तो काल आठ वाजता 1518 क्युसेक इतका करण्यात आला. नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून काल सकाळी 6 वाजता 25240 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी ते 12620 क्युसेक इतके करण्यात आले. गोदावरीचे कालवेही या बंधार्‍यातून पूर्ववत सुरू झाले आहेत. उजवा कालवा 300, डावा 100 तर एक्सप्रेस कालवा 400 क्युसेक वेगाने सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सुरू आहे. ते दोन वेळेस खंडित झाले होते.

गोदावरी नदीत नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात काल सकाळी 6 पर्यंत एकूण 3 लाख 61 हजार 875 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी 31.2 टीएमसी इतके आहे. खाली जायकवाडी धरणात उपयुक्त साठा काल रात्री आठच्या आकडेवारी नुसार 1022.576 दलघमी इतका असून तो 36.1 टीएमसी इतका आहे. हे धरण 47.10 टक्के भरले आहे. तर मृतसह एकूण साठा 1760.682 दलघमी इतका असून तो 62.1 टीएमसी इतका आहे. काल सायंकाळी 8 वाजता या धरणात गोदावरीतून 26666 क्ुयसेक वेगाने पाणी दाखल होत होते.

दारणा धरणात 88.40 टक्के पाणी साठा आहे. गंगापूरमध्ये 80.71, कडवात 85.43, मुकणे धरणात 61.14 टक्के पाणी साठा आहे. भावली, आळंदी, वालदेवी हे धरणे 100 टक्के भरलेली आहेत. काल सकाळी संपलेल्या 24 तासात नाशिक येथे 16 मिमि, दारणा येथे 6 मिमि, घोटी येथे 19 मिमि, त्रंबक येथे 33 मिमि, गंगापूर येथे 47 मिमि, अंबोली येथे 47 मिमि, तर इगतपुरी येथे 17 मिमि पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे.

LEAVE A REPLY

*