दोन दिवस चालणार जवखेडाची सुनावणी

0
सातजणांची साक्ष पुर्ण 

अहमदनगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात सात साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. मंगळवार (दि. 29) या खटल्यातील पंच प्रशांत सरगड व महादेव मरगड यांची सरतपासणी व उलटतपासणी विशेष जिल्हा न्यायाधीश माने यांच्यासमोर झाली. बुधवार (आजपासून) या खटल्याची सुनावणी नियमीतपणे होणार आहे.

आक्टोंबर 2014 मध्ये जवखेडा येथे संजय जाधव, सुनील जाधव, जयश्री जाधव यांची हत्या करण्यात आली. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला होता. घर, विहीर, शेत या ठिकाणी पंचनामा करीत असताना पोलिसांनी पंच म्हणून प्रशांत सरगड यांना साक्षीदार केले होते. तसेच बोअरवेलमध्ये मृताच्या खांडोळ्या करून टाकल्या होत्या. त्याचा पंचनामा करीत असतांना महादेव मरगड यांना पंच करण्यात आले होते.

विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी साक्ष घेत असतांना पंचांनी सर्व घटनेचा उलगडा न्यायालयासमोर मांडला. मंगळवारी दोघांची उलटतपासणी घेत असतांना आरोपी पक्षाच्या वकीलांनी काही संदिग्ध प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर न्यायालयाने अक्षेप घेत. काही प्रश्‍नांना विचारण्यास नकार दिला. दोघांची सरतपासणी व उलटतपासणी पुर्ण झाली असून आज एकाची साक्ष होणार आहे. या खटल्याची सुनावणी 30 ऑगस्ट पर्यंत चालणार असून एकूण तीन साक्षीदार पुर्ण होण्याची शक्यता आहे.

न्यायालयात पाणी पिऊ नका –
सरकार पक्षाचे वकील उमेशचंद्र यादव यांची प्रकृती खराब होती. त्यामुळे त्यांनी हा खटल्याची सुनावणी सुरू असतांना ते पाणी पित होते. यामुळे सुनावणीत अडथळा येत असल्याने खटला सुरू असताना पाणी पेवू नका असे आदेश न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे वकील वर्तुळात मोठी चार्च रंगली होत. या निर्णयामुळे यादव यांनी देखील आश्‍चर्य व्यक्त केले. 

LEAVE A REPLY

*