जनलोकपालसाठी राजघाटावर अण्णांचे चिंतन!

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जनलोकपाल कायदा अंमलात आणण्याचे वचन दिले, त्यामुळे आपण उपोषण मागे घेतले. हा कायदा आला सुध्दा मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी 15 दिवसात या कायद्यात बदल करून सर्वाधिकारी पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली आणण्याचा यातून प्रयत्न केला, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.
जनलोकपाल कायदा अधिक मजबूत व्हावा या मागणीसाठी नवी दिल्ली येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून सरकारला सुबुध्दी यावी यासाठी दि. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी राजघाटावर चिंतन करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
राळेगणसिध्दी येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या अगोदरच्या सरकारने लोकपाल कायद्याविषयी ज्या गोष्टी करणे आवश्यक होते ते नवीन सरकार तरी करेल अशी देशवासीयांना अपेक्षा होती. यासाठी गेली तीन वर्षे केंद्र सरकारला संधीही दिली. मात्र लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करणे सोडाच उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा अधिकच कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, आता 2011 प्रमाणे जनलोकपाल विधेयकाबाबत जनजागृती करण्यासाठी आपण आता बाहेर पडणार आहोत. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून दिवसभर चिंतन करणार असल्याचा मनोदय अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अण्णांचा जनलोकपालसाठी एल्गार पहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*