Type to search

Featured जळगाव फिचर्स

जनता कर्फ्यू : जिल्हाभरात एसटी सेवा दिवसभर बंद राहणार

Share

जळगाव –

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्या रविवार दि. २२ रोजी शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळे आगारातून निघणार्‍या बसेसही जवळपास बंद राहणार असून जनता कर्फ्यूमुळे बसेसही रस्त्यावर धावणार नाहीत. जळगाव आगारातूनही बसेस बंद राहतील.

जिल्हाधिकार्‍यांकडून बंदबाबत आदेश आहेत. मात्र एखाद्या ठिकाणी जास्त प्रमाणात जाणारे प्रवासी जर बसस्थानकात असतील तर अशा ठिकाणी काही अपरिहार्य कारणास्तव बसेस सोडल्या जातील.

तशी परिस्थिती पाहून बसेस त्या त्या ठिकाणी सोडण्यात येतील असेही आगार प्रमुखांनी सांगितले. मात्र जिल्हाभरातील बसेस शक्यतो बंद राहतील याची नोंद जनतेने घ्यावी असेही आवाहन राज्य परिवहन मंडळाच्या जळगाव विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!