जनार्दन स्वामींनी भक्तांमध्ये धार्मिक संस्काराचे बीजारोपण केले

0

मोहनराव चव्हाण : जनार्दन स्वामी आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव

कोपरगाव (प्रतिनिधी) – ज्ञानमार्गापर्यंत पोहोचण्यासाठी अनंत अडचणी असतात, मात्र अंतिम ध्येयापर्यंत साथ देऊन सन्मार्ग दाखविण्याचे महान कार्य प्रत्येकाच्या जीवनात गुरू करत असतात. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांनी सर्व भाविक भक्तांमध्ये सत्संग धार्मिक संस्काराचे बीजारोपण केले असे प्रतिपादन जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख मोहनराव चव्हाण यांनी केले.
जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमात गुरूपौर्णिमा उत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी नित्यनियम विधी सत्संग प्रवचन समाधीची महापूजा बाबाजींच्या पादुकांची पूजा आरती करण्यात आली. मधुगिरी, माधवगिरी, रमेशगिरी, शिवगिरी यांची यावेळी प्रवचने झाली. विश्‍वात्मक जंगलीदास माऊली आश्रम, ब्रम्हलिन संत रामदासी बाबा कोकमठाण येथेही गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते आशूतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे आदींनी दर्शन सोहळ्यास हजेरी लावली. साईबाबा तपोभ्ाूमी येथे गुरूपौर्णिमा सोहळ्यानिमीत्त काकडा आरती अभिषेक अभ्यंग स्नान पूजा योगेश अंबोरे यांच्या हस्ते कलशारोहण, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मध्यान्ह तर पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सांज आरती करण्यात आली.
साईबाबा प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. खंडोबा मंदिरात तळी आरती भरण्यात आली. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते साई पालखीचे पूजन करण्यात आले. साईशक्ती आश्रम कासली, दत्त पार कोपरगाव, विभांडक ॠषी आश्रम कोकमठाण, दत्त मंदिर विघ्नेश्‍वर चौक कोपरगाव, शृंगेश्‍वर मंदिर संवत्सर, मुकुंदस्वामी आश्रम मायगांवदेवी,
उपासनी महाराज साकुरी, स्वामी समर्थ मंदिर लिंबारा मैदान कोपरगाव याठिकाणी गुरूपौर्णिमेनिमीत्त विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कोकमठाण येथे भागवताचार्य योगेश फपाळ यांचे कीर्तन झाले. तर शिवानंदगिरी आश्रम मंजुर येथे सिध्देश्‍वर रूद्राभिषेक हवन निशाण पूजन श्रीगुरू पाद्यपूजा त्यानंतर किशोर महाराज खरात यांचे कीर्तन व शिवानंदगिरी महाराज यांचे प्रवचन पार पडले.

गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमीत्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थानावर राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात येथे महाप्रसाद म्हणून पन्नास पोते बुंदी तर पन्नास पोते मसालेभाताचे वाटप करण्यात आले. नागपूर, मुंबई, द्रुतगती मार्ग कोपरगाव शहराच्या जवळून जात असल्याने यंदा मराठवाड्यातून सर्वाधिक साईपालख्या शिर्डी दर्शनासाठी आल्या होत्या.  पावसाने दडी मारल्याने त्यांना यंदा पिण्यांच्या पाण्यांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावली.

LEAVE A REPLY

*