Type to search

Featured जळगाव मुख्य बातम्या

दोन शेतकर्‍यांनी संपवली जीवनयात्रा

Share

जामनेर – 

तालुक्यातील बेटावद खुर्द येथील एका शेतकर्‍याने कर्जबाजारी पणामुळे घरच्या शेतातील विहीरीमधे उडी मारून आत्महत्या केली. गोवींदसिंग मोतीसिंग राजपुत (वय 55) असे शेतकर्‍याचे नाव आहे.आत्महत्येची घटना विहीजवळ मिळालेल्या चिठ्ठीवरून सकाळी आठ-साडे आठच्या दरम्यान उघडकीस आली.

मयत शेतकरी गोवींदसिंग राजपुत यांचेकडे तीन एकर कोरडवाहु शेती असुन, त्यांनी विवीध वित्तीय संस्थांमधुन पाच लाखावर कर्ज उचलले होते.आणी घेतलेले कर्ज-त्यावरील व्याजासह होणारी रक्कम वेळेवर भरू न शकल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला.

विशेष म्हणजे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडु न शकल्याने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमधे नमुद आहे.मयत शेतकर्‍याच्या पच्छात पत्नी,तीन मुले,सुना-नातवंडे असा परीवार आहे.घटनेची पोलीसात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास हवालदार जयसिंग राठोड व सचीन पाटील हे करीत आहे.

तालुक्यातील ओझर खु येथील शेतकरी विलास श्रीरंग पाटील (वय 40) यांनी आज दि 12 रोजी संध्याकाळी 6वाजल्याच्या सुमारास शेतात विषारी औषध सेवन केल्याने मयत स्थितीत असल्याचे त्याचे भाऊ पाहण्यासाठी गेल्याने दिसून आले.

खाजगी व इतर 5 लाख रुपयांची कर्ज असल्याने शेतात आत्महत्या केल्याची घटना घडली. सरकारने कर्जमाफी केलेली असली तरी त्याचा त्यांना लाभ झालेला नाही.

मयताच्या पश्च्यात पत्नी 2 मुले, आई व 3 भाऊ असा परिवार आहे मुल दोन सुना आणि नातवंड असा परिवार आहे त्यांना मृत अवस्थेत उपजिल्हारुग्णालयात 8-45 वा आणण्यात आले त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!