Type to search

Breaking News जळगाव

शेंदुर्णी दूरक्षेत्राच्या लाचखोर पोलिसासह साथीदारास अटक

Share

वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी मागितली होती २१०० रुपयांची लाच

जळगाव (प्रतिनिधी) –
तक्रारदारासह कुटूंबियांच्या विरोधात निघालेल्या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी २१०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शेंदुर्णी दूरक्षेत्रातील पोलीस नाईक गजानन काशिनाथ पवार (रा.प्लॉट नं. ४७, सप्तश्रृंगीनगर, निर्मल रेसिडेन्सी हॉटेलच्या मागे भडगाव रोड, पाचोरा) आणि त्याचा खासगी साथीदार कडूबा लक्ष्मण पाटील (वय ५२) रा. गोंधळपुरा, शेंदुर्णी यांना जळगावातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केली. आरोपींनी १३ रोजी लाच मागितल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर १६ रोजी आरोपींना शेंदुर्णीसह जळगावातून अटक करण्यात आली.

लाच मागितल्याचे निष्पन्न
जामनेर तालुक्यातील २९ वर्षीय तक्रादाराविरुध्द निघालेल्या वॉरंटमध्ये तक्रारदार व कुटूंबियांना अटक न करण्यासाठी पहूर पोलीस ठाणेअंतर्गत येणार्‍या शेंदुर्णी दूरक्षेत्रातील पोलीस नाईक गजानन काशिनाथ पवार याने १३ ऑक्टोबर रोजी त्याचा खासगी साथीदार कडूबा लक्ष्मण पाटील याच्या माध्यमातून ४ चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ही रक्कम २१०० रुपये ठरविण्यात आली. पंचांसमक्ष आरोपींनी लाच मागितल्याचे सिध्द झाल्यानंतर बुधवारी सुरुवातीला पोलिसाचा खासगी साथीदार व त्यानंतर दुपारी जळगावातून पोलीस नाईक पवार यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकूर, निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर आदींनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!