Type to search

जळगाव

चार गावांना पाणी पुरवठा करणारा  शहापूरचा वाघोळा प्रकल्प कोरडाच

Share
शहापूर ता. जामनेर- येथील शहापूरसह शेंगोळा, शेळगांव, टाकरखेडा या गावांना पाणीपुरवठा करणारा वाघोळा प्रकल्प वीस जुलैअखेर कोरडाच आहे. या प्रकल्पातुन  शहापूरसह शेंगोळा, शेळगांव, टाकरखेडा या गावांची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. तसेच याच प्रकल्पातून उन्हाळ्यात पाच गावांना पाणी पुरवठा करण्यात आला होता.
       येथील खडकी नदीवर १५ वर्षापूर्वी वाघोळा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. तेव्हा प्रकल्पातून फक्त शहापूर गावासाठी पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता मात्र या प्रकल्पातून तिन गावांच्या पाणी पुरवठयाचा भार वाढला आहे. भविष्यात चांगला पाऊस न झाल्यास या गावांचा पाणी प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. पावसाचे आगमन लवकर झाल्यास पाणी टंचाईचे सावट दूर होईल.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!