Type to search

Breaking News जळगाव

तरूणावर कोयत्याने हल्ला : पहूर पेट्रोल पंपावरील घटना

Share

पहूर, ता.जामनेर (रविंद्र लाठे) –

मालवाहतूक पियाजो रिक्शा चालक तरूणावर अज्ञात इसमाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज दि.२२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील अजिंठा पेट्रोल पंपावर घडली.

यात जखमी झालेल्या तरूणावर तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील उपचारार्थ त्यास जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज दुपारी दोनच्या सुमारास अजिंठा पेट्रोलपंपावर मालवाहतूक रिक्शा घेऊन डिझेल भरण्यासाठी आलेल्या राजमल अर्जुन बोरसे (वय २८) रा.लोंढरी (ता.जामनेर) या तरुणावर अज्ञात इसमाने कोयत्याच्या सहाय्याने पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला वाचविण्यासाठी आजुबाजूच्या लोकांनी धाव घेतली. त्याच्यावर तत्काळ ग्रामीण रुग्णालयात डॉ.मंजूषा पाटील व कर्मचाऱ्यांनी उपचार केले. पुढील उपचारासाठी जखमीस सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, आरोग्य दूत अरविंद देशमुख यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती.

रूग्णवाहिका बंद

पहूर ग्रामिण रुग्णालयाची रुग्णवाहीका तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तर १०८ रूग्णवाहीका डॉक्टरांअभावी बंद असल्यामुळे जखमीस खासगी वाहनाद्वारे जळगावला हलविण्यात आले. दरम्यान रुग्णवाहीके अभावी रुग्णांचे हाल होत असल्याने रुग्णवाहिकेची सेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!