Type to search

Breaking News जळगाव

पहूर पेठ येथे पाण्याच्या टाकीवरुन पडल्याने मजूर ठार, एक जखमी

Share

पहुर ता जामनेर (वार्ताहर )- 

येथील ग्रुप ग्रामपंचायत पहूर पेठ गावाच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवर काम करत असताना पडून मजुराचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

पहुर पेठ ग्रामपंचायत यांच्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीवरून पाण्याच्या टायपिंग काम करत असलेले जळगाव येथील अशोक सपकाळे (वय 55) व वासुदेव पाटील या दोन्ही कामगारांचा काम सुरू असताना तोल जाऊन पाण्याच्या टाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या शरीरात लोखंडी आसारी घुसल्याने अशोक सपकाळे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला वासुदेव पाटील त्याच्या पायाला आसारी घुसून जखमी झाला आहे.

वासुदेव पाटील याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना स्थळी प्रदिप लोढा, राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे व ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन जखमीला काढण्याचे काम केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!