Type to search

Breaking News जळगाव

कांग नदीपात्रात आढळला युवकाचा मृतदेह

Share

हिवरखेडे बुद्रुक, ता.जामनेर (वार्ताहर)-

येथील कांग नदीच्या पात्रातील ग्रामपंचायतीच्या जुन्या सार्वजनिक विहिरी जवळ अनिल मोतीलाल परदेशी (वय ४४) रा.जामनेर पुरा यांचा मृतदेह आढळल्याची घटना दि.१९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मयत हा दि.१८ रोजी कांग नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नगरखाना ते जामनेर पुरा भागाला जोडणाऱ्या नवीन पुलावर दिसल्याचे नागरीकांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर तो घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला असता तो कोठेही आढळून आला नाही.

दि.१९ रोजी हिवरखेडे बुद्रुक येथील स्थानिक मच्छीमार कांग नदीच्या पात्रात मच्छी पकडत असताना त्यांना सदर मृतदेह दिसून आला. स्थानिक व शिंगाईत येथील मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मृतदेह आढळल्याची वार्ता गावांसह शहरात पसरली. शोधाशोध करणा-या नातेवाईकांसह नगरसेवक बाबुराव हिवराळे, शंकर राजपुत, प्रल्हाद बोरसे, हिंमत राजपुत, भारत चौधरी, दिलीप परदेशी आदी घटनास्थळी पोहोचले व सदर मृतदेह हा अनिलचा असल्याची खात्री पटली.

त्यानतंर मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ७८/१९ प्रमाणे नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.रियाज शेख करीत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!