Type to search

Featured जळगाव

जामनेर : बभळाज गावजवळ क्रूझर गाडीचा भीषण अपघात 12 जखमी

Share
jalgaon

जामनेर (प्रतिनिधी) 

जामनेर तालुक्यातील लोणी येथील प्रवासी घेऊन जाणारी कु्रझर बभळाज गावा जवळील नाल्याच्या पुलावरुन खाली कोसळली़ यात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृति अत्यावस्थ आहे़. ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़. गाडीही वेगात असल्याने वळण रस्त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे़.

एमएच १५ सीएम ३९९० क्रमांकाची कु्रझर चालक आत्माराम विष्णू बोरसे (रा़ लोणी, फत्तेपूर) याने जामनेर येथील प्रवाश्यांना घेऊन मध्यप्रदेशातील पानसेमल येथे जात होते़ बभळाज गावाच्या पुर्वेस आनंदा महाजन यांच्या शेताजवळील नाल्याच्या पुलाच्या जवळ वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली क्रुझर थेट नाल्यात जावून कोसळली़. या गाडीत ११ प्रवासी बसलेले होते़ ते सर्व जखमी झाले असून यातील एकाची प्रकृति चिंताजनक आहे़. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे बभळाज ग्रामस्थ गावातच होते़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़.

 मदत कार्य वेगाने सुरु झाल्याने जखमी झालेल्या प्रवाश्यांना शिरपूर येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी तातडीने दाखल करण्याचे काम करण्यात आले़. या अपघातात शिवाजी राजाराम खैरे, विशाखा श्रीकृष्ण सोनवणे, श्रावण सुकदेव ताठे, अमोल भारत बोरसे, रेणुका उत्तम बोरसे, गजानन रघुनाथ जाधव यांच्यासह अन्य प्रवाशांचा समावेश आहे़ दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली होती़ मदतकार्य वेगाने सुरु आहे़.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!