Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#POK : लष्कराकडून पाकच्या ११ सैनिकांसह २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Share

श्रीनगर : पाकिस्तानने केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानच्या ११ सैनिकांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

दरम्यान पाकिस्ताने रविवारी सकाळी शस्त्रीसंधीचे उल्लंघन करत भारतीय लष्करावर गोळीबार केला होता. यात दोन भारतीय जवान शहीद झाले असून एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले आहेत. तर २२ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

काश्मीरमधील तंगधार विभागात पाकिस्तानी सैन्यानं सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले. या घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या चाकमीक भारताचे दोन जवान शहिद झाले. तर तीन नागरिक जखमी झाले आहेत. यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!