Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

जम्मू काश्मीरमध्ये आरएसएसच्या सदस्यावर गोळीबार

Share

जम्मू काश्मीर : मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवार शहरातील एका हॉस्पिटलमध्ये संशयित दहशतवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यावर गोळीबार केला. यात आरएसएस सदस्य असलेले चंद्रकांता शर्मा जखमी झाले असिन त्यांचा सुरक्षा रक्षकाचा यात मृत्यू झाला आहे.

दरम्यान आरएसएस सदस्य चंद्रकांता शर्मा हे तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते. स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या मिळालेल्या माहितीनुसार दवाखान्यात काही संशयितांनी आतमध्ये प्रवेश करत आरएसएस सदस्यावर गोळीबार केला.

या घटनेत आरएसएस सदस्य चंद्रकांता शर्मा किरकोळ जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!