काश्मीरमध्ये चकमकीत ‘हिज्बुल’च्या कमांडरला कंठस्नान

0

श्रीनगर : जम्मू कश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. र शोपियाँ येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपासून ही चकमक सुरू झाली होती.

हंदवाडामधील शाहगूंड या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर डॉ. मन्नान बशीर वानी याचा समावेश असल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे. मात्र, या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, ही चकमक ताजी असतानाच शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

*