Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

काश्मीर: त्रालमध्ये चकमक, २-३ अतिरेक्यांना घेरले

Share
श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू आहे. या परिसरात जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्राल भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानूसार 42 राष्ट्रीय रायफलचे जवान, सीआरपीएफच्या 180 बटालीयनचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घातला आहे. जवानांकडून शोध मोहीम राबविण्यात आली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी जवानांनी देखील त्यांना उत्तर देत गोळीबार सुरू केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!