Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

सशस्त्र दलांच्या जवानांना काश्मीरमध्ये विमान प्रवासाची सुविधा

Share
नवी दिल्ली : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमध्ये तैनात निमलष्करी दलाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, निमलष्करी दलाच्या जवानांना यापुढं दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, श्रीनगर-जम्मू व जम्मू-श्रीनगर दरम्यान विमानानं प्रवास करता येणार आहे. सुमारे ७ लाख ८० हजार जवानांना याचा लाभ होणार आहे.

पुलवामा घटनेअगोदर सीआरपीएफच्या जवानांनी विमान प्रवासासाठी मागणी केली होती, मात्र त्याला मंजूरी मिळाली नसल्याचे वृत्तप्रसिद्ध झाले होते. मात्र सरकारने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यानंतर आता जवानांना विमान प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!