Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

Breaking : जम्मू-काश्मीर: जैश ए मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

Share
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासांत सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांदरम्यान तीन चकमकी झाल्या असून त्यात आतापर्यंत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर आज सकाळी बडगाम जिल्ह्यातील परगाम परिसरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत पाच जवान जखमी झाले असून परगाममध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गेल्या २४ तासातील ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी बुधवारी शोपियां येथेही चकमक झाली होती. तिथे सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त मोहितेत ३ दहशतवादी मारले गेले होते. तर गुरूवारी सुरक्षादलांनी हिज्बूलचा दहशतवादी रमीज अहमद दार याला जिवंत पकडले होते. सुरक्षादलांनी त्याला अनंतनाग येथील दहशतवादी प्रभावित भाग बिजबेहडा येथून अटक केली होती. अटक केलेल्या दहशतवाद्याकडे मोठ्याप्रमाणात हत्यारे आणि इतर सामुग्री जप्त करण्यात आली आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!