Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

Breaking : जम्मूमध्ये बस स्टँडजवळ स्फोट; १८ जखमी

Share
जम्मू : जम्मू कश्मीरमध्ये अद्यापही वातावरण तणावपूर्ण असतानाच जम्मू बस स्थानकाजवळ स्फोट झाला आहे. स्फोटात १८ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून परिसर रिकामा करण्यात आला आहे. हा स्फोट कशाचा झाला, तसेच स्फोटा मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी हल्ल्याच्या घटनेला दुजारो दिला आहे. गर्दीनं गजबजलेल्या बस स्थानकावरच हा हल्ला झाला आहे. त्यामुळं जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!