Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रसात जन्माचे नाते 16 दिवसांत संपले

सात जन्माचे नाते 16 दिवसांत संपले

जम्मू-काश्मीर । वृत्तसंस्था – 

राजस्थानच्या जवानाला पाकच्या नापाक हरकीमुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जवान सौरभ कटारा कुपवाडा इथे झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. शहीद जवान सौरभ कटारा यांचे अवघ्या 16 दिवसांपूर्वी 8 डिसेंबर रोजी लग्न झाले होते.

- Advertisement -

सौरभ यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर सौरभ यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी संध्याकाळी सौरभ कटारा यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ यांचा बुधवारी वाढदिवस होता. सौरभ आणि त्यांच्या मोठ्या भावाचे एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी दोन सख्ख्या बहिणींशी लग्न झाले होते. त्यानंतर, पाच दिवसांपूर्वी रजा संपल्यानंतर सौरभ कुपवाडाला नोकरीसाठी गेले होते.

पण काश्मीरमध्ये कुपवाडा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली तर सौरभ यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे.यावर बोलतांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटले आहे की भरतपूरच्या शूर

सैनिकाच्या हुतात्म्यास सलाम. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सर्वोच्च बलिदान करणारे सौरभ कटारा. या कठीण परिस्थितीत आम्ही सर्व आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत उभे आहोत. देव त्यांना सामर्थ्य देईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या