Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

जम्मू काश्मीर आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश होणार; राज्यसभेत प्रचंड गोंधळ

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविण्याची शिफारस गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेतील निवेदनात केली. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. कलम 370 चा खंड 1 वगळता अन्य सर्व बरखास्त केल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. जम्मू-काश्मिर विधानसभेसह केंद्राशासित प्रदेश, लद्दाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करत असल्याचे त्यांनी घोषित केले. यासोबत जम्मू-काश्मिरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा संपुष्टात आला आहे. तर जम्मू काश्मीर आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश असतील असेही सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह थेट संसदेत पोहचले आहेत. सकाळी 11 वाजता त्यांनी काश्मिरबाबत निवेदन केले. यामध्ये त्यांनी काश्मिरमधील ३७० कलम हटविण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.

सुरक्षेच्या कारणास्तव सीआरपीएफच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काश्मिर नेत्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोाबईल आणि लॅण्डलाईन सेवा बंद करण्यात आली आहे. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी व्टिटरवरून आपण नगरकैदेत असल्याचे म्हटले आहे.

केंद्राने राज्यांना हाटअलर्टवर ठेवले आहे. विरोधी पक्ष राष्ट्रपतींची भेट घेवून स्थगन प्रस्तावाच्या विचारात आहेत. लद्दाखमध्ये मात्र काही प्रमाणात बंदोबस्त शिथील आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!